शिरुर दिनांक ( वार्ताहर ) रुमपार्टनरनेच मित्रांच्या मोबाईलची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असुन आरोपीकडुन 72.200/-रु. चे पाच मोबाईल पोलीसांनी हस्तगत करुन आरोपीस अटक केली आहे . ऋषिकेश दिगंबर मैलारे वय 22 वर्षे, सध्या रा. कारेगाव यशईन चौक, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. कलंमबर, ता. लोहा, जि.नांदेड यास याप्रकरणी अटक केली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार याप्रकरणी श्रीकांत नारायण वडझे वय 23 मुळ रा. कलंबर, ता. लोहा, जि. नांदेड यांनी फिर्याद दिली होती . वझे हा त्याचे मित्र अजय कॉडलवाडे, योगेश वरवटे, ऋषिकेश मैलारे यांच्यासह कारेगाव येथील यश इन चौकात राहण्यास होते व रांजणगाव एमआयडीसी मधील प्रियंका टेन्कोपॅक कंपनीत कामाला आहेत. 30 जून 2023 रोजी त्यांचे राहते खोलीमधुन अज्ञात आरोपीने विवो कंपनीचे 02, रेडमी कंपनीचे 02 व सॅमसंग कंपनीचा 01 असे एकुण 05 मोबाईल एकुण किंमत 72,200 /रु. चे चोरुन नेले होते. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द फिर्याद दाखल करण्यात आली होती . या गुन्हयाचे तपासामध्ये तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे व पोलीस कॉन्सटेबल विजय शिंदे यांनी चोरीस गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन पोलीसानी गुन्हयातील आरोपी ऋषिकेश दिगंबर मैलारे वय 22 वर्षे, सध्या रा. कारेगाव यशईन चौक, ता. शिरूर, जि. पुणे. मुळ रा. कलंमबर, ता. लोहा, जि.नांदेड यास अटक करुन त्याचेकडुन मोबाईल हस्तगत केले आहेत . हा तपास पोलीस अधिक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधिक्षक मितेश मिट्टे , उपविभागीय पोलीसअधिकारी शिरूर यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक निलकंठ तिडके, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, पोलीस हवालदार संतोष औटी यांनी केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार तेजस रासकर हे करत आहेत.