पाहुणी म्हणून आली आणि दहा तोळ्यांवर डल्ला मारून गेली
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे भीमराव नितनवरे यांच्या घरी पाहुनी म्हणून आलेल्या महिलेने घरातील दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारुन दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आर्तीक्षा आकाश गांगुर्डे या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे राहणारे भीमराव नितनवरे यांच्या भाचीची मुलगी आर्तीक्षा गांगुर्डे भीमराव यांच्या घरी पाहुनी म्हणून आलेली होती, दरम्यान भीमराव यांच्या पत्नीने त्यांच्या घरातील देवघरात ठेवलेले सोन्याचे दहा तोळे सोन्याचे दागिने दाखवले होते, त्यांनतर दोन तीन दिवसांनी आर्तीक्षा तिच्या ठाणे येथील घेती गेली दुसऱ्या दिवशी भीमराव यांची पत्नी लक्ष्मी यांना बाहेर जायचे असल्यामुळे त्यांनी देवघरात ठेवलेले दागिने घालण्यासाठी पिशवी काढली असता त्यामधील दहा तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले त्यांनतर भीमराव नितनवरे व लक्ष्मी नितनवरे यांनी चर्चा केली असता त्यांच्याकडे पाहुनी म्हणून आलेल्या आर्तीक्षा हिनेचे सदर दागिने चोरले असल्याचा संशय त्यांना आला त्यामुळे दोघांनी थेट ठाणे येथे जात आर्तीक्षाची चर्चा केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली त्यामुळे दोघे परत येत असताना आर्तीक्षा हिने भीमराव यांच्या मुलीला फोन करुन दागिने मी चोरले असून दोन दिवसात तुला आणून देते असे म्हणाली, त्यामुळे पाहुनी म्हणून आलेल्या महिलेनेच चोरी केल्याचे उघड झाल्याने याबाबत भीमराव चिमाजी नितनवरे (वय ४३ वर्षे रा. मलठण फाटा सायकर मळा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी आर्तीक्षा आकाश गांगुर्डे (रा. रुणाली माय सिटी तिसरा मजला दिवा जि. ठाणे) या महिलेवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने हे करत आहे.