छत्रपती संभाजीनगर
स्कार्पिओ अपघात एक ठार तर चार जखमी
Anc- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण- पाचोड राज्य मार्गावरील आखतवाडा फाटा येथे स्कार्पिओ गाडी ही पुलाच्या कठड्याला आढळ्याने अपघात होऊन एक जण जागी ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून या अपघातात
राहुल बापूराव केसभट याचा मृत्यू झाला आहे तर नानेगाव येथील सरपंच अनिल बोधने, ग्रामपंचायत सदस्य कैलास शंकर जाधव ,श्रीराम कल्याण बोधणे,बद्री नाहणू जाधव,हे गंभीर जखमी झाले आहेत,अपघात होताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पैठण येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले असता त्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सिग्मा हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले असून या घटनेची नोंद पैठण पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.