शिरुर दिनांक ( वार्ताहर ) नांगरगाव येथील नलगे वस्ती येथे घराच्या बंद दरवाजाचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करित ५ तोळे सोन्याचे दागिने सह रोख एक लाख ५६ हजार रुपये असा एकूण ३ लाख ८६ हजार रुपयेचा ऐवज चोरुन नेला . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार एकनाथ विष्णु नलगे वय 32 वर्षे धंदा शेती रा नलगे नागरगाव ता. शिरूर जि पुणे यांनी फिर्याद दिली आहे . दिनांक 04 जुलै 2023 रोजी दुपारी 12.30 ते 1.30 वा. च्या दरम्यान नलगे यांच्या घराच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून अज्ञात चोरटयाने सोन्याचा चकोर हार, प्रत्येकी 5 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठया , एक सोन्याची चैन , 7.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण सोन्याची कानातल्या रिंगा , मंगळसुत्र व 1,56000 रु ची रोख रक्कम असा एकूण 386000 रुपयेचा ऐवज चोरुन नेला . याप्रकरणी आधीक तपाद पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर एकनाथ पाटील करीत आहे