शिरुर दिनांक ( वार्ताहर ) सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्षाचा निकाल ९४.०३% तर द्वितीय वर्षाचा निकाल ८४.१३ % लागला . माजी गृहराज्यमंत्री कै. बापूसाहेब थिटे यांच्या प्रेरणेतून सन १९९५ मध्ये स्थापन केलेले सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी पॉलि शिरूर हे पुणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य कॉलेज असून या कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मुंबई मंडळा अंतर्गत घेण्यात आलेल्या डी. फार्मसीच्या सन २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात प्रथम वर्षाचा निकाल ९४.०२% व द्वितीय वर्ष निकाल ८४.१३% लागला. या परीक्षेत प्रथम वर्ष डी. फार्मसी मध्ये कु. राक्षे अनुष्का रावसाहेब ८४.००%, कु. गवळी काजल रमेश ८१.४०%, कु. झावरे शुभम बाबाजी ७६.६०% व द्वितीय वर्षात कु. घोरपडे सौदामिनी सुशीलकुमार ८४.५५%, कु. इधाटे प्रतीक्षा संपत ८२.१८%, कु. क्षीरसागर वैष्णवी रामदास ८१.४६% यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे व डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा , प्राचार्य डॉ . द्वारकादास बाहेती, प्रा. निवेदिता केसकर, प्रा. हेमांगी झिंजुर्के, प्रा. विशाल कारखिले, प्रा. मानसी गरदरे, प्रा. कल्याणी कहांडळ, प्रा. निखिल केदारी आदीनी अभिनंदन केले.

Sponsored

भारी बचत कार और फ्यूल दोनों पर - भाटिया एंड कंपनी बूंदी

मारुती सुजुकी S-CNG कार खरीदने पर अब CNG भरवाएं मात्र ₹ 76.22 per/kg की कीमत में, मार्केट रेट से ₹ 13.46 कम कीमत में | मारुती कार खरीदने पर भारी बचत | नियम और शर्तें लागू |