nn शिरुर दिनांक ( वार्ताहर ) गुरु पौर्णिमेनिमित्त सह्याद्री देवराई शिरुर येथे देशी झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले . गुरुपोर्णिमेचे औचित्य ठेवत गुरुजनाच्या सन्मान करुन त्याच्या हस्ते देशी झाडे लावण्यात आले यावेळी प्राथमिक शिक्षक ईश्वर गोसावी ,ज्ञानेश्वर कुंभार , चंद्रकांत खैरे यांच्या सन्मान करण्यात आला . येथील वेल्डिंग व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वसंत लोखंडे यांनी आपल्या वाढदिवस देशी झाडांचे वृक्षारोपन करुन साजरा केला . लोखंडे हे सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत क असून परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी असतात. व देवराई शिरुर च्या वतीने देशी झाडे पुणे नगर रस्त्यावरील हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर लावण्यात येत आहे या डोंगरावर वाढदिवसानिमित्त राजेंद्र लोखंडे व गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञानेश्वर कुंभार ,ईश्वर गोसावी व चंद्रकांत खैरे यांनी वृक्षारोपन केले . वाढते तापमान व पर्यावरणात होत असलेले बदल लक्षात घेता वृक्षारोपन व संवर्धनाची चळवळ आधिक व्यापक करण्याचा दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही शिक्षक ईश्वर गोसावी , चंद्रकांत खैरे व ज्ञानेश्वर कुंभार व व्यवसायिक राजेंद्र लोखंडे यांनी दिली .