हिंगोली विधानसभा सोशल मिडियाच्या सेनगाव तालुकाध्यक्षपदी विश्वनाथ खोडके यांची निवड.

हिंगोली विधानसभेचे काॅग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.2 जुलै शनिवारी रोजी हिंगोली विधानसभा सोशल मीडिया प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असुन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे विश्वासू श्री गणेश टेड्रींग कंपनी गोरेगाव विश्वनाथ खोडके पाटील यांची हिंगोली विधानसभा सोशल मिडिया सेनगाव तालुकाध्यक्ष प्रमुखपदी निवड करण्यात आली त्यांच्या या निवडिबद्दल त्यांचे हिंगोली जिल्ह्याभरात स्वागत केले जात आहे.माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने भाऊ सोबत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन विश्वनाथ खोडके पाटील यांनी केले आहे.