शिरूर दिनांक (वार्ताहर ) समृद्धी महामार्गावर झालेल्या बसच्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यान मध्ये शिरूर शहरांतील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. या तीन जणांच्या मृत्यूमुळे शिरूर शहरांवर शोककळा पसरली आहे. अपघातात शिक्षक कैलास बबन गंगावणे, कांचन कैलास गंगावणे, व डॉ. ऋतुजा कैलास गंगावणे हे मरण पावले आहेत. कैलास गंगावणे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून ते शिक्षक झाले होते. सध्या ते शिक्षक म्हणून निरगुडसर,ता. आंबेगाव जि .पुणे येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर कन्या डॉ. ऋतुजा यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. गंगावणे यांचे चिरंजीव आदित्य याच्या विधीच्या शिक्षणासाठीचा प्रवेशाला ते नागपूरला गेले होते. त्यावेळेस त्याच्या समवेत पत्नी व कन्या ऋतुजा होत्या. आदित्य याला नागपूरला सोडून शिरुर येथे येण्यासाठी ते विदर्भ ट्रव्हल्सचा बसने प्रवास करीत असताना समृद्धी महामार्गावर पिंपरखुटा येथे बसचा अपघात झाला. त्यात बस गाडीची डीझेल टाकीचा स्फोट होवून आग लागली व या आगीत होरपळून प्रवाशी मृत्युमुखी पडले . त्यात गंगावणे परिवारातील या तीन जणांच्या ही मृत्यू झाला आहे. गंगावणे कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यूने गंगावणे परिवारा सह शिरूर परीसरावर शोककळा पसरली आहे. गंगावणे कुटुंबाचे नातेवाईक बुलढाणा कडे रवाना झाले आहेत. फोटो ओळी कैलास गंगावणे , कांचन गंगावणे व डॉ. ऋतूजा गंगावणे फोटो