शिरुर दिनांक ( वार्ताहर )दिल्ली  येथील रोहित भट्ट कुटुंबाने   सह्याद्री देवराई शिरुर येथे  देशी झाडांचे वृक्षारोपन केले .   भट्ट हे  सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असणारे  आहेत . पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी पोटी  शहरातील सह्याद्री देवराई शिरुर देशी झाडे पुणे नगर रस्त्यावरील हॉटेल अंबिका शेजारील डोंगरावर लावण्यात येत आहे .या डोंगरावर भट्ट यांनी देशी झाडांचे  वृक्षारोपन केले . भट्ट म्हणाले की वृक्षारोपन व संवर्धनाची चळवळ आधिक सक्रिय करुन  मोठ्या प्रमाणावर  झाडे लावून ती संवर्धन  करण्याचा दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही भट्ट यांनी  दिली .