शिक्रापूरच्या त्या मुन्नाभाईवर बारामतीत गुन्हे दाखल

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे दोन वर्षापूर्वी आधार हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल उभारले, दरम्यान त्याच्यावर बनावट हॉस्पिटल बाबत गुन्हे दाखल होताच एका स्थानिक माजी सरपंचावर खंडणीचे आरोप करत गुन्हे दाखल केले होते, त्यांनतर कोविड काळात कोणतीही अधिकृत परवानगी नसताना कोविड सेंटर उभारले असल्याने गुन्हे दाखल झालेले असताना आता सदर मुन्नाभाईने बारामती तालुक्यात हॉस्पिटल सुरु करुन एका नर्सला प्रेमात अडकवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूरच्या त्याच मुन्नाभाईवर माळेगाव पोलिसांत विनयभंग सह ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून रामेश्वर विठ्ठलराव बंडगर असे सदर मुन्नाभाईचे नाव आहे.

                                 शिक्रापूर ता. शिरुर बनावट हॉस्पिटल चालवल्या प्रकरणी डॉ. रामेश्वर बंडगर याच्या विरुद्ध दोन वेळा गुन्हे दाखल करण्यात आलेले होते, सदर गुन्हे दाखल झाले असताना डॉ. बंडगर याने दोन वेळा वेगवेगळे पत्ते दिल्याचे पोलीस तपासात समोर आले होते, सध्या शिक्रापूर येथील हॉस्पिटल बंद असून डॉ. रामेश्वर बंडगर हा बारामती तालुक्यातील माळेगाव येथील रामकृष्ण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असून त्याने सदर हॉस्पिटलमधील एका एकोणीस वर्षीय नर्स युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून स्वतःचे लग्न झालेले असल्याचे लपवून सदर युवतीशी जवळीक करत प्रेमाच्या जाळ्यात घेत तिच्या पालकांशी चर्चा करत विवाहाची तयारी केली, दरम्यान युवतीशी जवळीक करत शारीरिक सुखाची देखील मागणी करु लागला मात्र युवतीच्या काही नातेवाइकांना डॉ. बंडगर याचा यापूर्वी विवाह झाला असून तो बनावट डॉक्टर असल्याबाबत गुन्हे दाखल झाल्याचे पुरावे मिळाल्याने या मुन्नाभाईचा भांडा फोड झाला, याबाबत पिडीत युवतीने माळेगाव पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर सध्या रा. माळेगाव बुद्रुक ता. बारामती जि. पुणे मूळ रा. शेलू बुद्रुक ता. पुसद जि. यवतमाळ याचे विरुद्ध विनयभंग तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहे.

............................

डॉ. रामेश्वर बंडगर याचे विरोधात गुन्हा दाखल होताच त्याला अटक केली असून सदर हॉस्पिटल त्याचे स्वतःचे कि अन्य कोणाचे या सह युवतीशी त्याने कोर्ट विवाह बाबत पूर्तता केलेली असताना त्यात पुढे काय झाले याबाबत चौकशी केली जाणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले.