प्रदीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित रक्तदान शिबिराचे वाघोली येथे आयोजन
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
मा. उपसरपंच शांताराम कटके यांचा प्रेरणा देणारा उपक्रम
वाघोली :
वाघोली ता हवेली येथे भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे व्हॉइस चेअरमन प्रदिपदादा वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व जागतिक रक्तदाता दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन वाघोलीचे मा. उपसरपंच शांताराम बापू कटके व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
वाघोली मधील शांताराम बापू कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर संपन्न झाले.
यामध्ये तब्बल १२६ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला.या शिबिरात विद्यार्थी, महिलांसह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही सहभाग नोंदविला.
या वेळी शांताराम कटके यांनी प्रदीप वळसेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले की "स्वैच्छिक रक्तदाता" म्हणून आपण जेवढे समाजातील लोकांना जागृत कराल तेवढी माहिती जनमानसात रुजेल. आजकाल सोशल मिडिया, डिजिटल मिडिया प्रिंट मिडिया आदी माध्यमातून समाजात जनजागृती करतांना पाहायला मिळते. आजकाल रक्ताची गरज कुणालाही असो, व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्वांपर्यत मेसेज पोहचिला जातो. यात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या रक्तदात्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज पावेतो आपल्या देशात अनेक प्रगतीच्या वाटा निर्माण झाल्या पण मानवी रक्तासाठी कोणताही पर्याय आजपर्यंत मिळाला नाही. रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत तथा कारखान्यात तयार होत नसते, हे आजही सर्व सामान्य माणसाला माहीत आहे. पण ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात..! याबाबतीत समाजात रक्तदानाविषयी सामाजिक बांधिलकी आपल्या जनमानसात रुजणे आवश्यक आहे.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी आव्हाळवाडीचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आव्हाळे, अनंत युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांचे, रक्तदात्यांचे आभारही या वेळी शांताराम कटके यांनी मानले.