स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त बकोरी देवराई वनराई प्रकल्पात वृक्षारोपण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त व कमल गोविंद वारघडे यांचे अमृत महोत्सवानिमित्त माहिती सेवा समिती, दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठाण व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बकोरी देवराई वनराई प्रकल्पातल ११०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. शासकीय अधिकारी, विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, वृक्ष प्रेमी, नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माहिती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांचे माध्यमातून मागील ५ वर्षांपासून वृक्षारोपण करण्यात येत आहे. बकोरी देवराई वनराई प्रकल्पात देश प्रजातींच्या झाडांसह ३० हजार झाडांचे वृक्षारोपण करून संगोपनाचे काम नियमित चालू आहे. पुढील काळामध्ये याठिकाणी ५ लाख झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.