बोरेश्वर मंदीरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी..

पाचोड;-

पैठण परिसरातील मुरमा येथील बोरेश्वर मंदिरांत महादेवाच्या दर्शनासाठी व अभिषेक करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.श्रावण महिना सुरु असल्यामुळे मंदिर फुलांचे डेकोरेशन करून सजवण्यात आले.दर्शन झाल्यानंतर महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.हर हर महादेवाचा गजर करत भक्तांनी पहाटे चार वाजेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहावयास मिळाले आहे.

छायाचित्रे-विजय चिडे,