बीड 08 ऑगस्ट ( प्रतिनीधी) शहरातील नूर एजुकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित अल हुदा ऊर्दू हाई स्कूल येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त भरगच्च कार्यक्रम व विवीध भव्य शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .

 शाळेच्या सर्व विद्यार्थी या सर्व स्पर्धांमध्ये अत्यंत हिरहिरीने सहभागी होत आहे .

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शाळेत ज्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे या मध्ये वक्तृत्व स्पर्धा,निबंधलेखन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रंगभरण स्पर्धा,गीतगायन स्पर्धा आदि स्पर्धांचा समावेश आहे.स्पर्धा तीन गटात घेतल्या जात आहे .अ' गट -- इयत्ता १० वी,ब' गट -- इयत्ता ९ वी,'क' गट -- इयत्ता ८ वी असे गट असुन वक्तृत्व स्पर्धेसाठी गट अ (वर्ग १० वा) करिता विषय स्वातंत्र्याची 75 वर्ष : यश आणि अपयश,स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचे योगदान,इस्लाम मध्ये स्वातंत्र्याची कल्पन ,गट ब (वर्ग ९ वा) साठी विषय नष्ट करा द्वेष, वाचवा आपला देश,मेरा भारत महान,भारत : काल, आज आणि उद्या,गट क (वर्ग ८ वा) साठी विषय स्वातंत्र्य वीर: मौलाना अबुल कलाम आज़ाद,स्वातंत्र्य दिवस आणि संदेश,स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचे योगदान असे विषय देण्यात आले. निबंधलेखन स्पर्धासाठी विषय गट अ (इयत्ता १० वी) करिता राष्ट्रीय एकता महत्व और आवश्यकता,गट ब (इयत्ता ९ वी)

विषय,सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा,गट क (इयत्ता ८ वी)

विषय,जर मी पंतप्रधान असतो/ असते तर! ,चित्रकला स्पर्धासाठी स्वातंत्र्य दिनावर आधारित कोणतेही एक चित्र काढणे असे विषय देण्यात आले.तसेच देश प्रेमावर आधारित गीत गायन स्पर्धाही आयोजीत करण्यात येणार आहे.प्रत्येक स्पर्धेतील प्रत्येक गटाला स्वतंत्र बक्षीस दिले जाणार आहेत. सर्व स्पर्धा मुख्याध्यापक डॉ पठाण सिराज खान यांच्या मार्गदरशनाखाली सांस्कृतिक विभाग प्रमुख शेख अब्दुल हमीद यांच्या नियोजनानुसार होत आहे सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासठी सहशिक्षक शिक्षक शेख मोईजोद्दीन , मुहम्मद रफीक, सय्यद रहबर, शिक्षकेत्तर कर्मचारी शेख रफीक, शेख मसूद, युनूस खान आदि