आठवण
तुझी आठवण येऊन गेली,
मला जुन्या जगतात घेऊन गेली...
स्वर छेडीता संगीताचे,
आठवण बावरी होऊन गेली...
वाटते असे पुन्हा जोडावे नव्याने बंद,
वाऱ्याची झुळूकही कानाजवळ येऊन गेली..
नाही मागणे तुझ्याजवळ आता,
एक मोरणी पंख सोडून गेली...
काय सांगू तुला व्यथा माझी,
तू नको त्या आठवणी देऊन गेली...
काय माहित आता तू कुठे आहेस,
पावसाची सरी उन्हातच येऊन गेली....
प्रशांत के दिवटे
रुईछत्रपती
पारनेर