शिरुर दिनांक (वार्ताहर ) केंद्र शासनाने सर्व सामान्यांच्या विकासा करिता विविध योजना कार्यान्वित केल्या असुन सामान्याच्या हितासाठी शासन कटिबध्द असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिरुर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे प्रभारी प्रदिप कंद म्हणाले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकिर्दीर्स नउ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद , भाजपा महिला अल्पसंख्याक आघाडीच्या राज्य पदाधिकारी रेश्मा शेख , भाजपाचे तालुकाप्रमुख आबासाहेब सोनवणे , संपर्कप्रमुख बाबूराव पाचंगे , किसान आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन मचाले , पुणे जिल्हा अल्पसंख्याक आघाडी चे जिल्हाध्यक्ष राजू शेख ,भाजपा युवा मोर्चाचे रोहित खैरे ,सरचिटणीस विजय नरके ,रश्मी क्षीरसागर,माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे , आदी उपस्थित होते . यावेळी प्रदीप कंद म्हणाले की देशात किसान सन्मान योजनेचा ११ कोटी ३० लाख शेतक- याना लाभ होत आहे .शेतक - यांच्या सन्मानासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत .जलजीवन योजने मार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठाची महत्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने आणली. शिरुर विधानसभा मतदारसंघात या योजनेतर्गत विविध गावात पाणी पुरवठा योजनाचे काम सुरु आहे .केंद्र शासनाने आरोग्य विमा योजना आणली. शासनाच्या या विविध योजना सर्वसामन्याचा विकासासाठी आहेत .थेट लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होतात जनधन योजंतर्गत ४० कोटी बॅक खाती सुरु झाले . देशात रस्त्याचे जाळे उभे करण्यात येत आहे. पुणे नगर रस्त्यावर दुमजली रस्त्या तयार करण्यात येणार आहे. अष्टविनायक रस्त्यांची कामे ही मोठया प्रमाणावर शिरुर विधानसभा मतदारसंघात झाली आहे. छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ परिसराचा विकासा करिता ४०० कोटी रु च्या विकास आरखडा शासनाने तयार केला आहे . कोरोना काळात जगातील सर्वात मोठे लसीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात झाल्याचे कंद म्हणाले .पंतप्रधान सडक योजना ,मुख्यमंत्री सडक योजना या मार्फत ही रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत .आशियाई खंडातील दोन नंबर बाजार समिती असणारी पुणे बाजार समिती ची २० वर्षा नंतर निवडणुक झाली व ती निवडणुक बहुमताने आम्ही जिंकली असे ही कंद म्हणाले . यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केले . फोटो ओळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकिर्दीर्स नउ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल शिरुर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.