चक्क महीला सरपंचपतीवर आली कावडीने पाणी वाहण्याची वेळ

सरपंचाच्या कुटुंबियांची ही हाल तर गावकऱ्यांची काय होणार ? नागरिकांची पाण्यासाठी पायपीट.

"ग्रामपंचायात कडून चार शासकिय विहीरपाण्याची टाकीवर लाखो रूपये खर्च"

पाचोड विजय चिडे:- पैठण तालुक्यातील मुरमा येथे गेल्या महिनाभरापासून पाणी नसल्याने गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. मात्र, या गोष्टीकडे सरपंच व ग्रामसेवकांचे सरासपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब म्हणजे, मुरमा येथील महिला सरपंच पती दादासाहेब शिंदे यांनी चक्क (दि.१५) रोजी स्वतःच्या घरी शासकीय विहीरीतुन कावडीने पाणी वाहतं असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने लक्षात आले की सरपंचाच्या कुटुंबियांची हे हाल तर गावकऱ्यांचे काय हाल असेल असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

मुरमा ता.पैठण या गावाची दोन हजार च्या जवळपास लोकसंख्या असून सध्या गावात महीना भरापासुन पाणी नसल्याने येथील नागरिकांना आजूबाजूच्या शेतांमधून पायपीट करीत पाणी आणावे लागत. गावांमधील चार ही सरकारी विहिरी पाण्यावाचून कोरड्याठाक पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे. वर्षापूर्वीच ग्रामपंचायत कडून गावामध्ये लाखों रुपयांची जल जिवन ही योजना राबवण्यात आली तर या छोट्याश्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी तब्बल चार विहीर आहे त्यामुधून लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन करण्यात आले आहे.परंतु, त्या पाईप लाईन ला पाणी सोडले जात नसल्याने मुरम्यात पाण्याची टंचाई असल्याचे सरपंच व ग्रामसेवकांना दिसत नाही का? असा संतप्त प्रश्न नागरिक करत आहेत. गावाच्या जवळपास एक महिन्या पासून कुठेही पाणी नसल्याने तब्बल एक किलोमीटर वरून नागरीक पायपीट करून पाणी आणावे लागत असून मे महीन्यापासुन गावात पाणी येत नाही तरी सरपंच, ग्रामसेवक ,उपसरपंच यांच्याकडून कुठल्या प्रकारचे यावरती उपयोजना करण्यात आल्या नाही तरी प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवावी,अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गुरूवार दि 15 जुन रोजी तर चक्क महिला सरपंच यांचे पतीदेव शासकीय विहिरीवरून कावडीने पाणी वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे मुरमा येथील ग्रामपंचायत कार्यालय हे उघडं नसल्याने येथील महिला सरपंचाची प्रतिक्रिया भेटू शकली नाही.

चौकट-

पाण्यासाठी रोजंदारी बुडवावी लागत असून नागरिकांकडे दिवसभर पाण्याचाच विचार असतो: आम्हा महिलांना पाण्यासाठी शेत शिवारात पायपीट करीत जावे लागते. घरात पाणी नसल्याने कोणत्याच कामात चित्त लागत नाही. दिवसभर पाण्याचा च विचार असतो.पाण्यासाठी महिलांचे च जास्त हाल होत असतात. एवढी गंभीर समस्या निर्माण झालेली असताना आमची पाण्याची समस्या कोणीच सोडवत नाही. 

अलका बंडू चिडे- ग्रामस्थ,मुरमा.

चौकट- पाणी टंचाई आहे, परंतु मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे गावातील विद्युत तारा तुटल्या होत्या त्यामुळे विजपुरवठा खंडीत झाल्याने गावकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी उशीर होत आहे.गावात चार विहीरी आहे. परंतु विहिरीला पाणी कमी असल्याने टँकरचे प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे.

उषा दिनकर मापारी, उपसरपंच (मुरमा)