शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे शिरूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी यांचे करिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध रुगण्यालायमधील वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले . या आरोग्य शिबिरास शहरातील सफाई कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून नेत्र तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी व हाडांची तपासणी करून घेतली. शिरूर नगरपरिषदेचे प्रशासक स्नेहा किसवे-देवकाते व शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ॲड . प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता राजश्री मोरे, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, शहर समन्वयक शुभम निचित, स्वच्छता विभागाचे मुकादम मनोज अहिरे तसेच स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परीश्रम घेतले. एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थिनी अनिता व्हटकर, दिपाली कन्नौजिया, नीता राठोड व प्रतीक्षा वाघमारे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे महत्त्व सांगितले. डॉ. योगेश उपलेंचवार, डॉ. सुभाष गवारी, डॉ. विठ्ठल विधाटे, डॉ. महेश भुजबळ, डॉ. रवीन बोरा, डॉ. जयंत लंके, श्री. संजय समुद्र, श्री. सतीश भालेराव डॉ. पूनम केंदळे, डॉ. ऋचा गोगले व सुखकर्ता मेडिकलचे फार्मसिस्ट यांचे आरोग्य शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले. फोटो ओळी शिरूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे शिरूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी यांचे करिता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.