शिरुर दिनांक ( वार्ताहर ) इंस्टाग्राम अकाउंट वर औरंगजेब याचा फोटो असलेला व्हिडीओ व औरंगजेबाचे फोटो हातामध्ये घेवून नाचणारे मुलांचा आक्षेपार्ह व्हिडीओची स्टोरी ठेवल्या  प्रकरणी पाच जणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात चार विधीसंघर्षित बालक असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यानी सांगितले . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गोपाळे यांनी फिर्याद दिली आहे . दिनांक ५ जून ते ९ जून २०२३ दरम्यान वेगवेगळ्या वेळी शिरुर गावचे हद्दीमध्ये रेहान असीफ काझी व इतर 04 विधिसंघर्षित बालक सर्व रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी त्यांचेकडील आपआपले इंस्टाग्राम अकाउंटवर औरंगजेब याचा फोटो असलेला व्हिडीओ आणि औरंगजेबाचे फोटो हातामध्ये घेवून नाचणारे मुलांचा आक्षेपार्ह व्हिडीओची स्टोरी ठेवल्या  प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून आधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत करीत आहे .