गंगापूर-(अप्पासाहेब गोरे)सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कापूस, मका, तूर, सोयाबीन, मुग, बाजरी, भुईमुग, पालेभाज्या इत्यादी पिकांचे सरसकट नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सर्वच पिक हातातून गेले आहे. परिणामी शेतकरी हताश होऊन पूर्ण वर्षभर आपले जीवन कसे जगायचे या चिंतेत आहे. करिता तत्काळ शिल्लेगाव / गाजगाव जिल्हा परिषद गटातील सर्वच गावातील शेतकऱ्यांचे शेतीचे सरसकट विना अट पंचनामे करून हेक्टरी शासकीय ५०००० रुपये तातडीची मदत द्यावी व हजारो शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विम्यातून आपल्या हक्काचा पिक विमा मंजूर व्हावा यासाठी आमदार.प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकरी नेते संतोष जाधव यांच्या नेतृत्वात शिल्लेगाव / गाजगाव गटातील सर्व गावातील सर्व शेतकऱ्यांच्या व सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ आँगस्ट रोजी जाहीर रास्ता रोको आंदोलनकरण्यात येणार आहे
//चलो सिद्धनाथ वाडगाव
एक लढा, शेतकऱ्यांच्या हक्काच्या न्यायासाठी"भव्य “शेतकरी क्रांती रास्ता रोको'आंदोलनास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊपस्थीत राहावे संतोष जाधव//
या वर्षी खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाउस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शंभर टक्के पेरणी केली, परंतु जुलै व ऑगस्ट महिन्यात सर्व महाराष्ट्रासह गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव/गाजगाव गटातील सिद्धनाथ वाडगाव, शिल्लेगाव, गाजगाव, घोडेगाव,काटेपिंपळगाव, शिरेसायगाव, रोटस्थळ, गोपाळवाडी, वडाळी, मेंढी, खोपेश्वर, बुट्टेवाडगाव, वजनापूर,
शेकटा, शिंगी, झोडेगाव, खडकवाघलगाव, तांदुळवाडी, उत्तरवाडी, बोलठाण, देवळी, महमदपूर, मंजरपुर,महेबूबखेडा, शिरेगाव, सुलतानाबाद, शंकरपूर, गवळीशिवारा, भागाठाण, आगाठाण, चिंचखेडा,
खडकनारळा,खादगाव, देरडा, फुलशिवरा, प्रतापपूरवाडी, डोमेगाव, बोरगाव, वसूसायगाव,
एकभुर्जी वाघलगाव, रांजणगाव पोळ, आपेगाव, गवळीधानोरा, कनकोरी, कोळघर, मालुंजा बु,शिरजगाव, शरीफपूर, शिंदेवाडी, मालुंजा खुर्द, नारवाडी, भालगाव, शहापूर, पळसगाव, गोळेगाव, गावात जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये तरी हजारो शेतकऱ्यांनी
आपल्या झालेल्या शेतपिकांचे नुकसान भरपाई मिळण्यासाठी व आपला हक्काचा पिक विमा मिळण्यासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने क्रांतीदिनाचे मुहूर्त साधून जाहीर “शेतकरी क्रांती रस्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे जाहीर आवाहन.. संतोष पा. जाधव यांनी केले आहे