वडजी येथे विविध विकास कामांचे सरपंच भुमरेंच्या हस्ते उद्घाटन

पाचोड  विजय चिडे/ रोहियो व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे, विलास भुमरे, सरपंच भाऊसाहेब गोजरे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीतून तीर्थक्षेत्र वडजी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन सरपंच शिवराज भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यात कृष्णा महाराज समाधी येथे सिमेंट रस्ता व परिसरामध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे, मरोहमी योजनेमधून २४ विहिर मंजूर, गावांतर्गत सिमेंट रस्ता आदींचा समावेश आहे.

यावेळी सरपंच भाऊसाहेब गोजरे, ग्राम सेविका माहोरे, उपसरपंच पंढरीनाथ ताकपीर, लेखक बाबा भांड, ग्रा. पं. सदस्य गोविंद गोजरे, लक्ष्मण गारुळे, दीपक झिने, मोहन झिने, चेअरमन बाबासाहेब गोजरे, व्हाईस चेअरमन कल्याण ताकपीर, शरद सहकारी कारखान्याचे संचालक सुभाष गोजरे, सुभाष भांड, बाबु गोजरे, प्रभाकर सुकासे, आबासाहेब गोजरे, देविदास ताकपीर, बापुराव ताकपीर, संतोष भांड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.