शिरुर दिनांक वार्ताहर - मलठण, ता .शिरुर येथे नानी मळाजवळ कोयत्याने केलेल्या हल्ल्यात लक्ष्मण ज्ञानेश्वर तांबे, वय ४७ वर्षे, धंदा नोकरी, रा. रावडेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, सध्या रा. वाकी खुर्द, एकतानगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे हे गंभीर जखमी झाले असुन यातील आरोपी हा विधीसंघर्षित आहे . याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ जून२०२३ रोजी दुपारी २.०० वाजण्याचा सुमारास मलठण ता. शिरूर येथील नानीचा मळा पुलावर लक्ष्मण तांबे हे मोटार सायकल एम. एच. १४ / जे. एफ. ४९१७ हे आई वडिल व बहिणीला भेटण्यासाठी सविंदणे ता. शिरूर येथे शिरूर मलठण रोडने जात असतांना मोटार सायकलवरून आलेल्या विधीसंघर्षित आरोपीने त्याची मोटार सायकल आडवी लावुन त्याचेजवळ असलेल्या बॅगेतुन कोयता काढून तुला लई माज आलाय का, तुझी कोर्टात केस कव्हर चालायची, ते कोर्टातुन मिटवुन घे, असे बोलून शिवीगाळ करीत हातातील कोयत्याने लक्ष्मण यांच्या कानाचे वर डोक्यामध्ये, गालावर, वार करून खुन करण्याचा प्रयत्न केला, व पुन्हा वार केला असता लक्ष्मण यानी हाताने अडविले असतांना उजवे हाताचे तळव्यावर, डावे हाताचे करंगळी, त्याशेजारील बोटाला गंभीर दुखापत केली . यासंदर्भात आधीक तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इस्पेक्टर उगले करत आहे .