https://shirurnewsशिरुर दिनांक ( वार्ताहर )हिंदु समाजाची संस्कृती जपण्यासठी पुढाकार घ्यावा असे आवाहन पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के यांनी केले . पतित पावन संघटना शिरूर शहर शाखेचे उदघाटन व पदग्रहण सोहळा तिळवण तेली समाज मारुती मंदिर बाजार येथे झाला . याप्रसंगी सोनटक्के बोलत होते . यावेळी पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख , बाळासाहेब भामरे . संजीव सलगर श्रीकांत शिळीमकर , मनोज नायर , गोकुळ शेलार , ज्ञानेश्वर साठे , मनोज पवार , जालिंदर टेमघरे , विजय गावडे , भाजपाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे , सचिन चिंचकर ,आकाश क्षीरसागर , रोहित इरोळे ,किरण देशमाने महेश मचाले ,बंटी वेदपाठक , पप्पु वाखारे पोपट दरेकर ,सुनील सावंत ,अक्षय औटी ,चंद्रकांत देशमाने ,तुषार मचाले चेतन दाते , ,विनोद पवार ,विजय नरके ,आदी उपस्थित होते . यावेळी पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष म्हणुन नारायण देशमाने ,उपाध्यक्ष विठ्ठल नामदेव पुणेकर , सचिव आप्पासाहेब आनंदा रासकर ,कार्याध्यक्ष नीलेश सुभाष शेजवळ ,संपर्क प्रमुख विशाल उबाळे यांनी पदाची सुत्रे हाती घेतली . सोनटक्के यांनी समान नागरी कायदाची अमंलबजावणी व्हावी अशी मागणी केली त्याच बरोबर हिंदु संस्कृतीचे जतन व संवर्धन करावे असे आवाहन करुन पतित पावन संघटनेच्या कार्याची माहिती दिली . भाजपाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे यांचे मनोगत झाले . स्वागत पतित पावन संघटनेचे शिरुर शहराध्यक्ष नारायण देशमाने यांनी केले . सुत्रसंचालन व आभार किरण घावटे यांनी मानले . फोटो ओळी शिरुर येथे पतित पावन संघटनेची शाखा उदघाटन व पदग्रहण सोहळा पार पडला .