योगीराजबाबा पालखी सोहळ्याच्या रथाचा मान 'पंजाब-तुफान' बैलजोडीला

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील श्री संत सदगुरू योगीराज बाबा महाराज पालखी सोहळ्याच्या रथासाठी बैलजोडीचा मान शंकर कर्पे यांच्या बैल जोडीला मिळाला असून पंजाब व तुफान अशी या बैलजोडीची नावे आहेत.

 टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील श्री संत सदगुरू योगीराज बाबा महाराज पालखी सोहळ्याचे टाकळी भीमा येथून गुरूवार (दि. १५) रोजी दुपारी एक वाजता पंढरीनाथ पठारे यांच्या हस्ते पुजन करून पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यावेळी ज्ञानेश्वर महाराज सरकटे यांचे कीर्तन होणार आहे. श्री संत सदगुरू योगीराज बाबा महाराज पालखी सोहळ्याचे यंदाचे हे १८ वे वर्ष असून पालखी सोहळ्यातील रथाच्या बैलजोडीचा मान शंकरराव नारायण करपे यांच्या 'पंजाब-तुफान' या बैलजोडीला मिळाला आहे. नुकतेच या बैलजोडीचे पुजन करण्यात आले.

 यावेळी पालखी सोहळा प्रमुख सुनीलतात्या वडघुले, बबनराव वडघुले, रामचंद्र शिवले, योगिराज उद्योग समुहाचे चेअरमन राहुल करपे, पोलीस पाटील प्रकाश करपे, शंकरराव करपे, अशोकराव करपे, शरद संकपाळ, दशरथ वडघुले, रामदास संकपाळ, राजेंद्र जाधव, संदिप गवारे, पांडुरंग ढोरे, मोहन वडघुले, आकाश वडघुले, विलास घोलप, बजरंग वडघुले, हरिदास साकोरे, तुकाराम वडघुले, सतिश घोलप, विलास वडघुले, शिवाजी चौधरी, विशाल म्हस्के व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.