'ना चांगले बस, ना चांगले टायर्स'; एसटीची प्रवाशांना रामभरोसे सेवा
पाचोड विजय चिडे
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती नादुरुस्त बस धावत असल्याने धक्कादायक प्रकार पाचोड ता.पैठण येथील येथील बैल बाजार स्थळा जवळ एक बस बंद पडल्याने अवस्थेत महामार्गावर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत उभा होती. बीड कडून छत्रपती संभाजीनगर च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या बसमध्ये अचानक बिघाड झाल्याने बसही त्या ठिकाणी उभा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. बस चालकाने बस खराब झाल्याने ती बस महामार्गावरती मधोमध लावून ठेवल्याचं छायाचित्रांमध्ये दिसत आहे. तरी आता राज्य परिवहन महामंडळांने संपूर्ण बसचे काम करून बस महामार्गावरती सोडवावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
(छाया-विजय चिडे, पाचोड)