शिरूर हवेली लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण असणार उमेदवार

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

तळेगाव ढमढेरे,प्रतिनिधी:

शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, अशी चर्चा काही दिवसापासून सुरु होती. या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून शिरूर हवेलीचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे हेच पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे खुद्द शरद पवार यांनी जाहीर केले आहे. 

अनेक दिवसांपासून विद्यमान खासदार डाँ. अमोल कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तर दुसरीकडे विलास लांडे यांनी शिरुर लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. यामुळे शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर आज विद्यमान खासदार डाँ. अमोल कोल्हे हेच पुन्हा शिरुरमधून लोकसभा लढवतील, असे शरद पवार यांनी जाहीर केले तर पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे, असे विलास लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.