शिरुर तालुक्यातील एका वाईन शॉपचे पैसे घेऊन कामगारच झाला फरार
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:
सणसवाडी (ता. शिरुर) येथे वाईन शॉप मधील सव्वा दोन लाख रुपये घेऊन कामगार फरार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे भानू प्रताप सिंह याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील विनस वाईन शॉपचे मालक वासुमल मानकानी यांनी त्यांच्या वाईन शॉप मध्ये भानू सिंह याला कामाला ठेवले असून सर्व व्यवहार तो सांभाळत होता, ३१ मे रोजी वासुमल मानकानी हे वाईन शॉप मध्ये आलेले असताना त्यांनी सव्वा दोन लाख रुपये वाईन शॉपमध्ये ठेवून भानू प्रताप कडे चावी दिलेली होती, दुसऱ्या दिवशी वाईन शॉपचा माल आलेला असताना शॉप उघडलेले नसल्याने टेम्पो चालकाने वासुमल यांना फोन करुन सांगितले, त्यांनतर त्यांनी वाईन शॉपचा कामगार भानू सिंह यांना फोन केला मात्र संपर्क झाला नाही, दरम्यान वासुमल हे सदर ठिकाणी येत त्यांनी अन्य कामगारांकडून चावी घेऊन शॉप उघडून पाहणी केली असता त्यांनी ठेवलेले पैसे नसल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे त्यांनी भानू सिंह यास वारंवार फोन केला असता संपर्क झाला नाही, त्यामुळे भानू सिंह हा पैसे घेऊन फरार झाल्याचे निदर्शनास आल्याने वासुमल लालचंद मानकानी (वय ६५ वर्षे रा. मित्रनगर छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी भानू प्रताप सिंह (रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. जुराखान खेडा ता. उन्नाव जि. उन्नाव उत्तरप्रदेश) याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव हे करत आहे.