विद्या विकास मंदिर विद्यालयाचा निकाल ९९.०९ टक्के

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवार (दि. २) रोजी ऑनलाइन जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालात शिरूर तालुक्याने बाजी मारली आहे. शिरूर तालुक्याचा निकाल ९६.४७ टक्के लागला असून तालुक्यातील तब्बल सत्तावीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे तर एकुण २२२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

यांमध्ये निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९.०९ टक्के लागला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य संजीव मांढरे यांनी दिली. यांमध्ये प्रथम क्रमांक शिवले सिद्धार्थ दत्तात्रय (९१.६०%) , द्वितीय क्रमांक करपे साक्षी मधुकर (९१.००%) तर चव्हाण रितेश संतोष (८८.४०%) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे प्राचार्य संजीव मांढरे, संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांतकाका पलांडे यांनी अभिनंदन केले.