शिरूर दिनांक ( वार्ताहर ) अनैतिक संबधावरुन वारंवार पैसे मागणे व पोलीसात बलात्काराची तक्रार करेन अशी धमकी दिल्याचा कारणावरुन विठठल अण्णा किर्तने याचा खुन करण्याचा प्रकार घडला असुन याप्रकरणी बबलू उर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर वय २७ रा . निंबाळकर वस्ती , न्हावरा ,ता शिरुर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी दिली . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपीनाथ शंकर चव्हाण वय 56 वर्ष सहाय्यक पोलीस फौजदार शिरुर यांनी फिर्याद दिली आहे . बबलू उर्फ रविराज ज्ञानदेव निंबाळकर वय 27 वर्षे रा न्हावरा यांने २४ मे २०२३ रोजी रात्रौ ८:३० वा. चे सुमारास वाळकी ता. दौंड जि. पुणे येथील मुळा मुठा नदीचे संगमाचे पुलावर नाना उर्फ विठ्ठल अण्णा किर्तने वय १९ वर्षे, रा. न्हावरा कारखाना, ता. शिरूर जि. पुणे. मुळ रा. किर्तनवाडी, खरवंडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर या तरुणाच्या पाण्यात ढकलुन खुन केला. विठ्ठल यांचा नात्यातील दोन महिला सोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते. .त्यावरुन विठ्ठल हा आरोपीस वारंवार पैसे मागुन, पोलीसांत बलात्काराची तक्रार करीन अशी धमकी देत असलेच्या कारणावरून कंटाळून, चिडून जावुन आरोपीने विठ्ठ्ल किर्तने यास मोटार सायकल एचएफ डीलक्स नं. एम. एच. १२ / एस. पी. ३९२४ वरून वाळकी , ता दौंड येथील मुळा मुठा नदीचे पुलावर नेवुन नदीपात्रात पाण्यात ढकलुन देवुन खुन केला. यासंदर्भातील आधीक तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जाधव करीत आहेत . आरोपीस अटक करण्यात आली आहे .