अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या युवकाला नदीत ढकलून खून
आरोपीला शिरूर पोलिसांनी ठोकल्या चोवीस तासात बेड्या
( शिक्रापूर प्रतिनिधी ) न्हावरे ता. ता शिरूर येथे अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या १९ वर्षीय युवकाला मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन जाऊन नदीवरून ढकलून देऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली असताना सदर घटनेत नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने या युवकाचा खून झाला असून बबलू उर्फ रवीराज ज्ञानदेव निंबाळकर असे खून करणाऱ्या व शिरूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
न्हावरे ता. शिरूर येथील निंबाळकर वस्ती येथे राहणाऱ्या बबलू उर्फ रविराज याचे गावातील एका महिलेची अनैतिक संबंध होते हे मयत युवक नाना याला माहीत असल्याने तो बबलूला वारंवार पैशाची मागणी करून पैसे उकळत होता तसेच मी महिलेसोबत पोलिसात जाऊन तुझ्यावर बलात्काराची केस करेल अशी धमकी देत होता त्यामुळे आरोपी धमकीला त्रासला गेल्याने बबलू याने २४ मे रोजी मयत नानाला त्याचे एम एच बारा एस पी ३९२४ या दुचाकी वर बसवून मुळा मुठा नदीच्या पुलावर घेऊन गेला आणि त्याला पाण्यात ढकलून त्याचा खून केला, या घटनेत नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने वय १९ वर्षे रा. न्हावरा कारखाना ता. शिरूर जि. पुणे मुळ रा. कीर्तनवाडी खरवंती ता. पाथर्डी जि. अहमदनगर याचा मृत्यू झाला आहे. मात्र सदर घडलेल्या प्रकारानंतर नाना उर्फ विठ्ठल आण्णा कीर्तने हा युवक बेपत्ता झाल्याने प्रथम शिरूर पोलीस स्टेशन येथे नाना बेपत्ता झाल्याची खबर नोंदविण्यात आली होती मात्र त्याचा मृतदेह मुळा मुठा नदीमध्ये सापडल्यानंतर शिरूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि सखोल तपास केला असता घडलेला प्रकार समोर आला याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ शंकर चव्हाण वय ५६ वर्षे रा. न्हावरा ता. शिरूर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरूर पोलिसांनी बबलू उर्फ रविराज ज्ञानदेव निंबाळकर वय २७ वर्षे रा निंबाळकर वस्ती न्हावरे ता. शिरूर जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहे.