शिरुर दिनांक (वार्ताहर) शिरुर शहर विकासकामाच्या माध्यमातुन सुंदर कसे होईल यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी केले . शिरुर शहरातील विविध विकास कामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. शहरातील कचरा डेपो वरील दीड कोटी रुची विकासकामे व स्टेट बॅक कॉलनीतील अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले . याप्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बाबूराव पाचर्णे , शिवसेनेने बापूसाहेब शिंदे , अनिल काशीद , शहरप्रमुख मयूर थोरात , अरुण गिरे, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. .पोकळे , आबासाहेब सरोदे , माजी नगराध्यक्षा उज्जवला बरमेचा , माजी नगरसेविका अंजली मयूर थोरात , सुनीता पोपटराव कुरुंदळे , संगीता मल्लाव ,ज्योती लोखंडे , रोहिनी बनकर , विठ्ठल पवार , पोपटराव कुरुंदळे , किरण बनकर , भाजपाचे विजय नरके , बाबूराव पाचंगे ,आदी यावेळी उपस्थित होते . आढळराव म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मागे ताकद उभी केली असुन मागील सहा महिन्यात कोट्यावधी रुपयांची विकास कामे शिरुर लोकभा मतदार संघात आणली आहे .शिरुर शहरातील कचरा डेपो वर १ कोटी ७० लाख रुच्या निधी विकासकामासाठी देण्यात आला आहे लाटेआळीतील नगरपालिका शाळेसाठी दीड कोटी रुपयेचा निधी मंजुर झाला असुन स्ऱेट बॅक कॉलनीतील अंतर्गत रस्त्याच्या कामा करिता ही निधी देण्यात आला असल्याचे ते म्हणाले .विकासकामांच्या माध्यमातुन शिरुर शहर सुंदर करणार आहे . माजी नगरसेविका अंजली मयूर थोरात सुनीता पोपट कुरुंदळे यांनी स्वागत केले . सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी तर आभार शहरप्रमुख मयूर थोरात यांनी मानले .

फोटो ओळी

शिरुर येथील विकास कामाच्या भूमीपूजन प्रसंगी माजी खासदार शिवाजीराव आढळराव व अन्य मान्यवर