छतावरती एसी दुरुस्ती करतांना खाली पडून तरुणाचा मृत्यू

"पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील घटना"

पाचोड (विजय चिडे) पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील मोढ्यां मध्ये शेंगदाण्याच्या गोदामाच्या छतावरती असणारी एसी दुरुस्ती करत असतांना खाली पडून एका 26 वर्ष तरुणांचा बुधवारी सायंकाळी ( दि.२५) रोजी पावणे सहाच्या दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असुन ऋषिकेश सुभाष नाटकर( वय 26) वर्ष रा.हिरडपुरी ता.पैठण असे मृत तरुणांचे नाव आहे.

याविषयी सूत्रांकडून भेटलेल्या माहितीनुसार, हिरडपुरी येथील ऋषिकेश नाटकर हा परिसरातील नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक फिटिंग चे काम करत होता. आज सकाळी तो विहामांडवा येथील मोढ्यांतील एका व्यापाऱ्याच्या शेंगदाण्याच्या गोदामावरती एसी दुरुस्ती करत असताना त्या गोदामावरती टाकण्यात आलेले पत्राला उन्हामुळे तडा गेल्याने त्या पत्राचा चिर जाऊन त्याचा तुकडा पडून ऋषिकेश नाटकर हा त्या पत्रावरून जमिनीवरती आदळला त्यामुळे ऋषिकेशच्या छातीला व तोंडाला जोरदार मार लागला होता. यावेळी घटनास्थळी असणाऱ्या नागरिकांनी ऋषिकेश यास तात्काळ खाजगी वाहनांद्वारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले असता कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी पवार यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देण्यात आली असता पोलीस उपनिरीक्षक सुधाकर मोहिते यांनी या घटनेचा पंचनामा करुन या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रशांत नांदवे,घडे हे करीत आहेत.