शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील यशवंत कॉलनीत गुरुवार दिनांक २५ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता संगीतमय सुंदरकांड हनुमान चालीसा पाठ कार्यक्रमाचे आयोजन कांतीलाल बोथरा ,अतुल बोथरा ,सार्थ बोथरा व पार्थ बोथरा परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे . याबाबतची आधिक माहिती देताना कांतीलाल बोथरा व अतुल बोथरा यांनी सांगितले की हा कार्यक्रम पंडित राजेंद्र शर्मा ( रामवाला ) व सागर शर्मा नागपूर हे सादर करणार आहेत भाविकानी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कांतीलाल बोथरा व अतुल बोथरा यांनी केले आहे .