अनेक खेळाडूच्या प्रेरणास्त्रोत व आधारवड - प्रा . नारायण काळे

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।

  काळे सरांनी क्रिडा शिक्षक म्हणून आपल्या कार्यकिर्दीस सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्या कुशल मार्गदर्शनातून स्थानिक पातळीवरील नाही तर राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले . त्याच्या कोठे ही गाजावाजा नाही . अनेक खेळाडू घडवून ही मी फक्त माझे काम केले अशी विनम्रतेची भावना व्यक्त करतो अन आपली क्रिडा शिक्षकाची भूमिका निष्ठने निभावत राहतो . हे शिक्षक म्हणजे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील क्रिडा शिक्षक नारायण किसन काळे .३१ मे २०२२ रोजी नियत वयोमनानुसार ते आपल्या प्रदिर्घ अश्या सेवेतून सेवानिवृत्त झाले . सर कॉलेज मधून सेवानिवृत्त झाले तरी सर सेवानिवृत्ती नंतर नवीन इनिंग मध्ये नवा भूमिकेत दिसतील अश्या विश्वास त्याच्या सर्व विद्यार्थ्याना आहे . सर काही आराम करुन निवांतपणे आयुष्य जगणा- या मधील नाहीत समाजासाठी आपण काही तरी केल पाहीजे या जाणिवेतून ते कार्यरत राहणारच आहेत . सर ज्या बोरा महाविद्यालयातुन शिक्षण घेतले त्याच ठिकाणी शिक्षक म्हणुन कामाला लागले तिथे त्यांनी विद्यार्थी ते शिक्षक असा प्रवास केला. फार काही मोजक्या लोकांच्या आयुष्यात अशी संधी येते की ज्या ठिकाणी आपले शिक्षण झाले त्याच ठिकाणी आपल्याला काम करण्याची संधी मिळणे . सर याबाबतीत भाग्यवान होते की त्याना त्याच्या शिक्षण घेतलेल्या संस्थेत काम करायला मिळाले . सरांचे वडिल किसनराव काळे हे शासकिय नोकरी निमित शिरुर शहरात आले. तेव्हा पासून सर शिरुरचे झाले ते कायमचे .सरांचे मूळ गाव रेटवडी ,ता खेड हे . सरांचे वडिल शासकिय नोकरीत असले तरी सरानी आपले संपूर्ण शिक्षण स्वावलंबाने व कष्टाने पूर्ण केले . वडिल किसनराव यांनी सांगितले होते की कष्टाला व श्रमाला कधी लाजू नको . कष्ट व श्रमाची आवड असल्यास कोणत्याही क्षेत्रात गेल्यास तर तुला अपयश येणार नाही .लक्षात ठेव कष्टाला व श्रमाला घाबरला कंटाळा गेला की कितीही मोठा माणूस असू दे त्याच्या जीवनात मोठे अडथळे निर्माण होतात .त्यामुळे नारायण काळे हे कधीच कष्टाला घाबरले नाही . शालेय व महाविद्यालयीन सुटीचा काळी व इतर वेळी आपल्या वेळ वाया घालविण्या ऐवजी त्यानी छोटे मोठे कामे करण्यास व उर्वरित वेळ अभ्यासात व्यतित करण्याचे ठरविले .सरानी शिरुर रिक्रिएशन क्लब मध्ये ग्रंथपाल म्हणून त्याच बरोबर शहरातील प्रसिध्द असणा- या पांडूरंग अभंग यांच्या इस्त्री दुकानात कपड्याना इस्त्री मारण्याचे काम आनंदाने केले .कामाची लाज न बाळगता काम केले .काम करताना कोणतेही काम हलके व मोठे नसते व कोणत्याही कामाला नाही म्हणायचे नाही हे सर लहानपणी शिकले याचा सरांना पुढच्या जीवनात खूप फायदा झाला व सरानी अनेक कामे यशस्वी पणे पार पाडली . अनेक जणाना माहित नसेल की सराना खरे तर पोलीस अथवा प्रशासकिय आधिकारी व्हायच होत त्यादृष्टीने सरानी अभ्यासाची तयारी ही केली . त्यानंतर सरानी परीक्षा ही दिली अवघ्या काही मार्कानी सराना यशाने हुलकावणी दिली .त्यामुळे सराचे प्रशासकिय आधिकारी अथवा पोलीस होण्याचे स्वप्न भंग पावले . सरांचे स्वप्न भंग पावले तरी त्याचे मोठे बंधु यानी मात्र सैन्य दलातील आधिकारी त्याच बरोबर पोलीस खात्यात डीवायएसपी पदापर्यत जात काळे घराण्याचा झेंडा प्रशासकिय सेवेत रोवला . सरांच्या स्वभाव साधा सरळ व विनयशील आहे. पहिल्या पासून सराना मित्रा मध्ये रमायला आवडते. मित्राच्या मोठ्या गोतावळा ही त्याची फार मोठी संपत्त्ती आहे .ज्याच्याशी मैत्री केली त्याला भरभरुन द्यायचे हा सरांचा स्वभाव. वेळ प्रसंगी स्वंत : अडचणीला सामोरे जायचे पण मित्रांच्या अडचणी दुर करायचे हे सर्व करताना मी तुझ्यावर उपकार केले असे काही भाव त्याच्यात कधी दिसत नाही. उलट कोणतीही मदत मित्राना केली तरी ते याची वाच्यता कोठेच करित नाही. बिनबोभाटपणे मदत करतात आजच्या काळात अशी निर्लेप व मोठ्या मनाची माणसे मिळणे खूपच अवघड आहे. त्यामुळे काळे सरांशी मैत्री म्हणजे नक्कीच आपण काहीतरी चांगले काम केले असेल म्हणूनच सरांसारखे मित्र लाभला अशीच भावना सरांचे मित्र व्यक्त करतात . सरानी आपल्या अनेक मित्रांच्या आयुष्याला आकार दिला व आधार दिला .वेळ प्रसंगी मित्रांना आधार देण्यासाठी धावले . सरानी इतरांसाठी खूप काही करुन ही कधीच कोण्याकडून कशाची अपेक्षा केली नाही .आपले मित्र मोठे होतात यशस्वी होतात याचे त्याना खूप कौतुक वाटते. मित्र मोठे झाले म्हणजे आपणच मोठे झाले अश्या खुशीत मित्रांच्या यशाचे सेलेब्रेशन करणारे सर . मित्र म्हणून सर्वाना हवे हवेसे वाटतात . तस पाहील तर महाविद्यालया विषयी तेथील जीवना विषयी आकर्षण सर्वाना असते .या महाविद्यालयीन जीवनात आपण काही तरी वेगळ कराव असे सर्वाना वाटत असते. महाविद्यालयीन युवकांच्या तील उत्साह ,उर्जा त्याच्यातील ताकद ही खेळाच्या माध्यमातून प्रगटावी यासाठी सरानी सातत्याने प्रयत्न केले .अभ्यासा इतके खेळाचे व व्यायामाचे महत्व सरानी विद्यार्थ्यानवर बिंबवले . ग्रामीण भागातून आलेल्या मुलामधून खेळाची आवड असणारी व खेळासंदर्भात आवश्यक असणारी कौशल्ये असणारे मुले व मुली अचूकपणे हेरण्याचे व त्याना घडविण्याचे अवघड काम सरानी अविरत पणे केले विविध खेळा मध्ये ग्रामीण भागातील मुले व मुलीच्या सहभाग वाढावा याकरिता सबंधित मुलांच्या पालकांशी सातत्यपूर्ण संवाद साधण्या बरोबर खेळाडू मधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी सरानी पुढाकार घेतला . सर कोणतीही नवीन गोष्ट स्वीकारण्यात पुढे असतात. बदलत्या काळानुसार क्रिडा क्षेत्रात होणा- या बदलाना ही सामोरे जात स्वंत : मध्ये ही बदल करत गेले . नियमित व्यायाम हा त्याच्या जीवन शैलीचा भाग आहे .पोहणे ,क्रिकेट व बॅटमिडन हे त्याना सर्वाधिक आवडते. त्याच बरोबर वॉकिंग व योगासना विषयी विशेष आस्था आहे . बोरा महाविद्यालयातीक अद्यावयत बॅडमिंटन हॉल मध्ये अनेक नवीन बॅडमिंटन खेळण्यासाठी आलेल्या मुलाना मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव पुढे असतात त्याच बरोबर कुस्ती व व्हॉलीबॉल बाबत ही त्याना विशेष आवड आहे . त्यामुळेच प्रा .राजेद्र क्षीरसागर प्रा.डॉ पोपटराव वीरकर या वरीष्ठ सहकार्या समवेत त्यानी अनेक खेळाडु घडविले. वैयक्तिक जीवनात सरांवर अनेक आघात व संकटे कोसळली पण सर त्या सर्वाना धीराने सामोरे गेले .अनेक वर्ष आजारी पत्नीची सेवा कोणतीही सबब न सांगता न थकता केली . परंतु सातत्याने विविध औषध उपचार करुन ही पत्नी हेमा याना मृत्युने गाठले. आयुष्याच्या अर्ध्या वाटेवरती सरांच्या सहधर्मचारिणी गेल्या नंतर सराच्या मोठा आधार हरपला. पत्नीचा मृत्युचा अगोदर सराचे मोठे बंधु हे ही अकस्मात आजारपणात गेले . वैयक्तिक जीवनात दु: खाचे डोंगर कोसळत असतानाही सरांनी खचुन न जाता पुन्हा जिद्दीने स्वंत : ला सावरले .अन पुन्हा एकदा खेळांवर व विद्यार्थी घडविण्यावर लक्ष केंद्रित केले . सरांचे स्वप्न आहे की ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय पातळीच्या गुणवत्तेचे विद्यार्थी घडवायचे यासाठी ग्रामीण भागातील मुलाना लहान पणा पासून विविध खेळाचे शास्त्रशुध्द कौशल्य शिकवायची विद्यार्थ्याच्या क्रिडा कौशल्याचा विकास करित त्या विद्यार्थ्याला उत्तम खेळाडू म्हणून तयार करायचे या करिता क्रिडा प्रबोधिनी उभारुन त्या दवारे काम करायचे .सरांचे हे क्रिडा प्रबोधिनीचे स्वप्न निश्चितच साकार होवो यासाठी व ६० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .