गौरी गणपतीनिमित्त सुनीता ताईंना शेक हँडकडून पिको फॉल मशिनची भेट देवून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक सण निराधार ताईंच्या घरी शेक हँड मार्फत साजरा केला जातो. गौरी गणपती हा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात. गौरी हा सण फक्त सौभाग्यवती साजरा करतात. विधवा ताई हा सण साजरा करत नाहीत म्हणून शेक हँडने हा सण या ताईसोबत पिको फॉल मशीन देऊन साजरा केला. सुनीता ईश्वर शिंदे या ताईच्या पतीचे फेब्रुवारी महिण्यात हार्ट अटॅक येऊन निधन झाले.त्यांचे पती दुसऱ्याच्या दुकानावर शिलाई काम करत होते.शेती अथवा इतर कुठलीही संपत्ती नसल्यामुळे कर्त्या पतीच्या निधनानंतर परिस्थिती हलाखीची झाली.त्यात दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत.मुलगी 11 वीला तर मुलगा इंजिनीरिंग प्रथम वर्षात शिकत आहे. त्यांचे घर देखील अत्यंत साधे पार्टिशन चे असून एका रूम मध्ये त्या व दोन मुले राहतात.या सर्व परिस्थितीचा विचार करून शेक हँड कडून त्यांना पिको फॉल मशीनचे वाटप गौरी गणपती सणानिमित्त करण्यात आले. तसेच प्रा उत्तमराव इंगळे यांच्याकडून सुनीताताईंना साडी चोळी देण्यात आली. या कार्यक्रमास शेक हँडच्या वैभव ठाकूर,अर्चना भारस्वाडकर,दिपक घुंगरे,अजय महाजन,सतीश चव्हाण, कौसाईतकर यांच्यासह शेक हँडच्या सदस्यांनी आर्थिक मदत जमा केली. कार्यक्रमास प्रा संदीप गवते,शिवाजी वाघमारे,शिंदे सह शेक हँड चे मुंजाभाऊ शिळवणे,कृष्णा पांचाळ,शेख अन्वर,नितीन तांदळे,दिपक घुंगरे,संतोष चव्हाण,शरद लोहट आदी उपस्थित होते.