जिल्ह्यातून चार वाहने लंपास
बीड जिल्ह्यात २४ तासांत चार वाहने लंपास झाली . परळी , माजलगाव तालुक्यासह बीड शहरात या घटना घडल्याचे ७ ऑगस्ट रोजी समोर आले . माजलगाव तालुक्यातील हरकी लिमगाव येथून सिद्धेश्वर शिंदे यांची ४० हजारांची दुचाकी ( एमएच ४४ यू ५६४४ ) चोरट्यांनी ३० जुलै रोजी लंपास केली . वामन प्रल्हाद कोळेकर ( रा . ताडसोन्ना , ता.बीड ) या संशयितावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविला . दुसरी घटना पांगरी ( ता . परळी ) येथे २ ९ जुलै रोजी घडली . नामदेव गोंदगे यांचा २५ हजारांचा रिक्षा ( एमएच २३ एन . १४७० ) चोरट्यांनी लंपास केला . ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला . तिसऱ्या घटनेत बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारासमोरून २० जुलै रोजी शेख राजू वजीर ( रा . पिंपळनेर ता.बीड ) यांची १५ हजारांची दुचाकी ( एमएच २३ एएल -५५२६ ) चोरट्यांनी पळवली . शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला . चौथी घटना शाहूनगरातील गजानन कॉलनीत 3 ऑगस्ट रोजी घडली . दीपक हरिश्चंद्र जाधव यांची २० हजार रुपयांची दुचाकी ( एमएच २३ एस - ९ ५४५ ) चोरट्यांनी लंपास केली . शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.