शिरुर दिनांक ( वार्ताहर ) कर्डे ,ता शिरुर येथील जाधव वस्ती येथुन दोन खिलारी जातीचे बैल अज्ञात चोरट्याने चोरुन नेले आहेत . यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ‌संदीप देवराम जाधव वय 38 वर्ष सध्या राहणार काळेपडळ हडपसर पुणे मूळ राहणार- करडे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे . २१ मे रोजी कर्डे येथील जाधव वस्ती वरुन रात्री एक ते पहाटे ६ या वेळेत अज्ञात चोरट्याने खिलारी जातीचे दोन बैल संदिप जाधव यांच्या घरामागील असणा- या गोठातुन चोरुन नेले .याबाबतचा आधीक तपास सहाय्यक फौजदार गोपीनाथ चव्हाण करीत आहेत .