गोरेगाव ग्रामपंचायत पंधरा वित्त आयोगातुन आलेल्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि माजी महिला व बालकल्याण सभापती रुपाली ताई पाटील यांच्या हस्ते संपन्न...
सेनगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोरेगाव येथील ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगातुन सुमारे 37 लाख 13 हजार रुपये निधी प्राप्त झाला असुन या निधीतून विवीध विकासकामांला सुरवात करण्यात आली असून यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे
वार्ड क्रं एक मधील गोरेगाव ते गोटवाडी पादनरस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी 14 लाख 61 हजार रुपये तर वार्ड क्रं.दोन मधील भारत पेट्रोलपंपा समोरील नालीच्या कामासाठी 22 लाख 52 हजार रुपये निधीतून कामे होणार असून या कामांचे भूमिपूजन दि 20 शनिवारी रोजी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि माजी महिला व बालकल्याण सभापती रुपाली ताई पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा ग्रामपंचायत तर्फे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भैय्या पाटील, सरपंच दासराव कावरखे, उपसरपंच विश्वनाथ कावरखे, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल खिलारी, अभियंता यच. टी. सगर, प्रदीप पाटील, सुनिल पाटील,G.M.खिलारी, सोपान रणबावळे,नथुजी खिलारी,गंगा पाटील, गजानन गिरे, विठ्ठल राजे,माजी पंचायत समिती सदस्य अशोक कावरखे, ग्रामपंचायत सदस्य सौ. सरस्वती बोडखे, डॉ. आर.जी.कावरखे, रंगनाथ पाटील पहेनिकर, मदन शेळके, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.