वडजी येथे विद्युत तारा लोबंकळ्याने गावकरी अडचणीत
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पाचोड (विजय चिडे)पैठण तालुक्यातील वडजी येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारात दिवसेंदिवस वाढ होत असून, विद्युत प्रवाहित वाहिन्यांचे तार तुटून आता नागरिकांच्या घरावर पडत आहे. त्यामुळे मोठी घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करत आहे.
सातत्याने ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासनाने पत्र देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे वडजी येथील नागरिकांनी आता संताप व्यक्त करत आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे.रात्री- अपरात्री नागरिकां ना लाइनमन, कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना रात्री तसेच दिवसाही रोहित्रावर फ्यूज टाकण्यासाठी धोका असतानाही नागरिकांना जावे लागत आहे.
चौकट-
गावात विद्युत वाहिन्यां संदर्भात दुरुस्ती व योग्य ते व्यवस्थापन करण्याचे पत्र दावरवाडी येथील महावितरण अधिकाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपूर्वी दिले आहे.परंतु महावितरण विभागांकडून कोणती या वरती कुठली उपयोजना करण्यात आलेली नाही. तरी संबधित अधिकाऱ्यांनी तात्काळ गावातील लोंबकळत असलेल्या विद्युत तारी व्यवस्थित करावे.
भाऊसाहेब गोजरे, सरपंच वडजी.