औरंगाबाद : (दीपक परेराव ) - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘ हर घर तिरंगा ' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे . या उपक्रमाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाववी म्हणून विद्यालयाच्या वतीने शाळेच्या परिसरातील भागात जन जागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत विद्यार्थ्यांच्या हातात घोषवाक्याचे फलक देण्यात आले होते. हर घर तिरंगा या उपक्रमाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद रामदास वाघमारे, आण्णा आंधळे, राजेश आंधळे, जितेंद्र शिंदे,अनिता कांबळे, अनिता देशमुख, सोनाली पाटील, काकासाहेब निकम, उत्तम जाधव यांनी परीश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.