शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारपंप चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ठोकल्या बेड्या.25 हजारांचा मुद्देमाल जप्त.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
दोन गुन्हे उघडकीस,25 हजारांचा मुद्देमाल जप्त. मागील काही दिवसांमध्ये सेनगाव व गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटार पंप चोरीच्या घटना वाढल्या होत्या यामुळे शेतकऱ्यांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले होते यामुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या चोरीच्या घटना संदर्भात सदर गुन्ह्याचा छडा लावण्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांना सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करीत दि.16 मे रोजी पोलीस स्टेशन सेनगाव अंतर्गत बोरखेडी शेत शिवारातील पाणबुडी मोटार चोरी गेल्या संदर्भाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासचक्रे फिरवुन गोपनीय माहिती आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी रघुनाथ मोहन डाखोरे रा.हिवरखेडा आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी बोरखेडी शेत शिवारातील मोटारपंप चोरल्याचे कबूल देत चोरी केलेले विद्युत मोटार पंप देले तर गोरेगाव हद्दीमध्ये सुद्धा चोरी केल्याचे कबूल केले , त्यावरून पोलीस स्टेशन सेनगाव व पोलीस स्टेशन गोरेगाव हद्दीतील दोन गुन्हे उघड करून चोरीचा मुद्देमाल विद्युत पाणबुडी मोटार किंमत अंदाजे 25,000 ही जप्त करुन आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर , अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे , पोलीस अंमलदार लिंबाजी वाव्हळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेखुळे यांच्या पथकाने केली आहे.