पाझर तलावातील गाळ नेण्यास मज्जाव करत सरपंच पतीपुत्रांकडून तिघांना मारहाण
"पैठण तालुक्यातील कोळीबोडखा-मुरमा शीव रस्त्यावरील घटना"
पाचोड/ पाझर तलावातील गाळ-माती शेतात नेण्यास मज्जाव करत शेतकऱ्याला सरपंच पती पुत्रांनी संगणमत करून बेदम मारहाण केल्याची घटना पैठण तालुक्यातील कोळी बोडखा-मुरमा शीव रस्त्यावर मंगळवारी ( दि.१६) रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, कोळी बोडखा ता.पैठण येथील पाझर तलावातील गाळ काढण्याचे कॉन्ट्रॅक्ट हा एका स्वयंसेवी संस्थेला भेटला असतानी त्यांनी त्या ठिकाणी गाळ माती काढण्याचे काम सुरू केले.ही गाळ माती आपल्या शेतात टाकण्यासाठी परिसरातीत शेतकरी नेहत होते. यावेळी मुरमा ता.येथील महिला सरपंचपती पुत्र हे देखील त्या पाझर तलावातून गाळ माती घेऊन जात होते. यावेळी गावातील निलेश चिडे हा तरुण त्या ठिकाणी जाऊन गाळ माती भरत असताना त्यास सरपंचपती पुत्रांनी तुमचा या माती वरती कोणताही हक्क नाही.तू कोणाला विचारून नेत आहेस. आम्ही सरपंच आहोत. आम्ही काही करू शकतो असे म्हणत असताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी सरपंच पती दादासाहेब वैजिनाथ शिंदे,पुत्र आप्पासाहेब दादा शिंदे, गणेश दादा शिंदे यांनी निलेश चिडे यास चापड बुक्क्यांनी हाणामार करण्यास सुरू केली असता. शुभम चिडे व गणेश मापारी या दोघा जणांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला असता. त्यांच्या वरतीही सरपंचपती पुत्रांनी हल्ला चढवला यामध्ये ते दोघेही किरकोळ जखमी झाले आहे. याप्रकरणी दोघांच्या परस्पर तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार किशोर शिंदे हे करीत आहेत.