वाघोली ता.हवेली येथे रामेश्वर शास्त्री प्रसादिक दिंडी मंडळाचे मार्गदर्शक व वाघोलीचे माजी उपसरपंच संजयआप्पा अमृतराव सातव पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाच्या खर्च टाळत धर्मशाळा बांधण्यासाठी आर्थिक मदत केली आहे.
संजयआप्पा सातव पाटील यांच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधून कुटुंबियांच्या वतीने तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रामेश्वर शास्त्री प्रसादिक दिंडी मंडळ दिंडीला पंढरपूर येथील धर्म शाळेच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी जवळजवळ अंदाजे 5,30,000 हजार रुपये देणगी देण्यात आली,
या देणगीचा धनादेश शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दिंडी मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वाघोली परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजयआप्पा सातव पाटील यांच्या वतीने कै. सौ. आई चांगुणाबाई अमृतराव सातव पाटील तसेच वडील कै अमृतराव विठोबा सातव पाटील तथा रावसाहेब यांच्या स्मरणार्थ 2 लाख 51 हजार रुपये देणगी देण्यात आली ,तर वाढदिवसानिमित्त केलेल्या आवहानाला प्रतिसाद देत संपत ज्ञानोबा गाडे यांनी 50 हजार रुपये, शिवाजी रामदास सातव यांनी 21 हजार रुपये, भाऊ कै संजय उर्फ अण्णा कुंडलिक हरगुडे यांच्या स्मरणार्थ विजयराव कुंडलिक हरगुडे यांनी 21हजार रुपये,आईंच्या स्मरणार्थ नटराज शामराव सातव पाटील यांनी 15 हजार रुपये, दादासाहेब बबनराव सातव पाटील यांनी 11हजार रुपये, वडील कै भगवानराव पाचारणे यांच्या स्मरणार्थ गणेश भगवान पाचारणे व सौ रेशमाताई गणेश पाचारणे (सदस्या ग्रामपंचायत) यांनी 11हजार रुपये,ज्ञानेश्वर माऊली धोत्रे यांनी 11 हजार रुपये, तर आजोबा प्रभू गोरे व आई छबुबाई बनाजी गोरे यांच्या स्मरणार्थ रोहिदास बनाजी गोरे यांनी 11हजार रुपये,वडील कै उत्तमराव नामदेव जाधव यांच्या स्मरणार्थ शैलेश जाधव व सागर उत्तम जाधव यांनी 11 हजार रुपये, युवराज सुदामराव दळवी यांनी 11 हजार रुपये, संजय ज्ञानोबा दरेकर (मानकरी) यांनी 11हजार रुपये, संग्राम नरसिंहराव जाधवराव 11हजार रुपये, राहुल कैलास सातव पाटील यांनी 11 हजार रुपये, कै सोमनाथ भंडलकर यांच्या स्मरणार्थ दीपक सोमनाथ भंडलकर यांनी 11 हजार रुपये,वडील कै विठ्ठलराव सातव यांच्या स्मरणार्थ नवनाथ विठ्ठलराव सातव यांनी 5 हजार रुपये,विलास बाबुराव कुसाळकर यांनी 5 हजार रुपये, गणेश शिवाजीराव भंडलकर यांनी 5 हजार रुपये, राजेंद्र बबनराव तांबे यांनी 5 हजार रुपये, वडील कै ज्ञानेश्वर पांडुरंग सरमाने यांच्या स्मरणार्थ कुलदीप ज्ञानेश्वर सरमाने यांनी 5 हजार रुपये, ज्ञानोबा बाजीराव सातव पाटील यांनी 5 हजार रुपये,आईंच्या स्मरणार्थ स्वप्निल दशरथराव कुंभार यांनी 5 हजार रुपये, एवढी मोठी रक्कम आप्पांच्या वाढदिवसानिमित्त रामेश्वर शास्त्री प्रसादिक दिंडी मंडळ दिंडीला पंढरपूर येथील धर्म शाळेच्या तिसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी देणगी रूपाने देण्यात आली
आप्पांच्या कुटुंबीयांकडून तसेच आप्पांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने दिंडीला मिळालेले बांधकामासाठी देणगी खूप मोठे योगदान आहे खरंच आप्पांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम राबविला, वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून त्यांनी दिंडीला मोठी मदत केली म्हणून दिंडीच्या माध्यमातून सर्वप्रथम आप्पांचे व सर्व कार्यकर्त्यांचे दिंडी मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो असे रामेश्वर शास्त्री प्रसादिक दिंडी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सातव (गवळी) यांनी सांगितले