तेरा वर्षापासून फरार असलेला दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीच्या चिकलठाणा पोलिसांनी आवलल्या मुसक्या
पोलीस स्टेशन चिकलठाणा हद्दीत सन 2010 साली दरोड्याचा गुन्हा घडलेला होता. या गुन्ह्यामध्ये नंनग्या मोमीन चव्हाण वय 55 वर्ष रा. सालवडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता त्याचा चिकलठाणा पोलीस बऱ्याच दिवसापासून शोध घेत होती. त्याला गून्हात अटक करण्यासाठी चिकलठाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री खांडेकर यांनी वेगवेगळी पथके स्थापन करून गोपनीय बातमीदार सुद्धा नेमलेले होते. त्यांना आज खबरा मार्फत खबर मिळाली की, नंग्या हा एका विवाह सोहळ्या साठी पैठण तालुक्यातील नांदर या गावी येणार आहे. खबऱ्याने दिलेल्या खबरीची तात्काळ दखल घेऊन पोलीस निरीक्षक स्वतः एक पथक घेऊन नांदर या गावी गेले खबऱ्याने नंग्या आल्याची माहिती देताच त्याल पकडण्यासाठी पथक गावामध्ये गेले. परंतु पोलिसांची चाहूल लागताच नंग्या हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला पोलिसांनी त्याचा एक किलोमीटर पाटलाग करून त्यास पकडले.
सदरची कार्यवाही ही मा. श्री मनीष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. श्री सुनील लांजेवार अपर पोलीस अधीक्षक,DYSP श्री. जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री रविंद्र खांडेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश देवकर,दीपक देशमुख, गणेश कोरडे यांनी केली आहे.