शिक्रापुरात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार
महिलेच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथे राहणारी महिला एकटी घरी असताना महिलेच्या घरी जाऊन महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन महिलेला बेशुध्द करत जबरदस्तीने महिलेवर बलात्कार करुन घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुर्यकांत चंद्रकांत शिर्के याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील पिडीत महिलेची सुर्यकांत शिर्के याचे सोबत ओळख झालेली असताना सुर्यकांत हा जून २०२१ मध्ये सदर महिलेच्या घरी गेला त्याने पेप्सी शीतपेय घेऊन जाऊन त्यामध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेला पिण्यास देऊन महिलेला बेशुध्द देऊन महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करत सदर घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले, त्यांनतर सदर चित्रीकरण बाबत महिलेला बोलून व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत महीलेवर वारंवार अत्याचार करु लागला, त्यामुळे महिला जानेवारी २०२३ नंतर सदर ठिकाणहून दुसरी कडे राहण्यास गेली मात्र सुर्यकांत हा वारंवार महिलेशी संपर्क करुन त्रास देऊन धमकी देत असल्याने आंखे महिलेने याबाबत फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुर्यकांत चंद्रकांत शिर्के रा. हिवरे कुंभार ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध बलात्कार सह आदी गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे.