शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर शहर मुस्लिम जमात सन २०२३ ते २०२८ या वर्षासाठी झालेल्या विश्वस्तच्या निवडणुकीत ११ जणांची निवड झाली . शिरुर मुस्लिम जमाअतच्या विश्वपदाचा ११ जागांसाठी रविवारी मतदान झाले . यात सादिक बागवान ,साजिद रसिद शेख ,समद काझी , मोनीब अस्लम शेख ,साबिर पठाण ,हाजी करीम सय्यद ,युनुस शिकलकर ,अब्दुल सय्यद ,राहिल शेख ,वसिम सय्यद ,आरिफ सय्यद हे ११ जण विश्वस्त म्हणून निवडुन आले . या नवनिर्वाचित विश्वस्तांच्या सन्मान करण्यात आला . यावेळी शिरुर मुस्लिम जमातचे इक्क्बालभाई सौदागर , डॉ.मोसीन पठाण ,माजी नगरसेवक मुन्ना आबिद शेख , आझिम सय्यद ,कलिम सय्यद ,,वसिम सय्यद , आदीची मनोगत झाली . आमदार ॲड .अशोक पवार ,प्रसिध्द उद्योगपती माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांनी यावेळी मोबाईल वरुन नूतन विश्वस्तांना शुभेच्छा दिल्या .यावेळी सूत्रसंचालन माजी नगरसेवक मुझफ्फर कुरेशी यांनी केले .