शिरुर दिनांक ( वार्ताहर )  दिग्दर्शक भाउराव क-हाडे यांच्या  टीडीएम  या मराठी चित्रपटाच्या समर्थनासाठी व या चित्रपटाला मुंबई पुणे येथील चित्रपटगृहात प्राईम टाईमचा शो मिळावा या मागणी साठी  शिरूरला शनिवारी  दिनांक ६ मे रोजी ट्रक्टर  मोर्चा  भाऊराव  क -हाडे प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात येणार आहे.   

दिनांक २८ एप्रिल रोजी टीडीएम हा मराठी चित्रपट पुण्यासह  महाराष्ट्रात  प्रदर्शित झाला होता. परंतु चारच दिवसांत अनेक प्रतीथयश चित्रपटगृहांमधून अचानकपणे हा चित्रपट काढून टाकण्यात आला. तर  काही  चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारला  या पार्श्वभूमीवर शिरूर मधील भाऊराव कन्हाडे यांची मित्रमंडळी समर्थक एकवटले असून त्यांनी क-हाडे  यांच्या पाठीशी उभे राहताना चित्रपटाला पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर  पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला उमेश शेळके , योगेश महाजन , रुपेश घाडगे , अनघा पाठकजी ,रेश्मा शेख , नितीन अवचार , अवीनाश घोगरे शिवम पाठकजी  आदी उपस्थित होते  मोर्चा बाबत माहिती देताना उमेश शेळके यांनी सांगितले की शनिवार ६ मे रोजी सायंकाळी चार वाजत  शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चास सुरुवात होईल व तहसिल कार्यालयावर मोर्चा जाईल .