शिरुर विधानसभेचा भाजपाचा उमेदवार कोण ?शिक्रापूर प्रतिनिधी - शिरुर विधानसभेच्या जागेची नेहमीच वेगवेगळी चर्चा होत असून अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी व भारतीय जनता पार्टीकडे सदर जागा राहिलेली असताना काही दिवसांपूर्वी भारतीय जनता परतीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले असल्याने आता पुढील काळात शिरुर विधान सभेचा भारतीय जनता भारतीय उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

                         शिरुर विधानसभा मतदार संघ अनेकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राहिलेला असताना यापूर्वी माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे यांनी प्रतिनिधित्व केले असून सध्या अशोक पवार प्रतिनिधित्व करत आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जयश्री पलांडे यांनी निवडणूक लढवलेली असताना त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले, मात्र त्यानंतर बाबुराव पाचर्णे यांनी देखील दोन वेळा विधानसभेची जागा भाजपाच्या ताब्यात आणली होती, तर मंगलदास बांदल यांनी एकदा भाजपा कडून उमेदवारी लढवली असून त्यांना अपयश आले होते, काही दिवसांपूर्वी माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन झालेले असल्याने भाजपाकडे तुल्यबळ उमेदवार कोण असे बोलले जात असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद तसेच शिरुर तालुक्यात विविध आंदोलने यशस्वी केल्याने विविध आंदोलनाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी विधानसभा मतदार संघात वेगवेगळ्या माध्यमातून आपला संपर्क सुरु ठेवून आपल्या उमेदवारीची तयारी सुरु ठेवलेली असताना यापूर्वी भाजपाकडून उमेदवारी लढवलेले भाजपाच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या जयश्री पलांडे यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याने त्या स्वगृही आलेल्या आहेत, तर यापूर्वी भाजपाकडून उमेदवारी लढवलेले जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल सध्या कोणत्याही पक्षात नसताना ते सर्व पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याने बांदल कोणत्या पक्षात असणार हे अद्याप देखील स्पष्ट नाही, मात्र राष्ट्रवादी कडून शिरुर विधानसभेसाठी आमदार अशोक पवार हे उमेदवार निच्छित असताना भारतीय जनता पार्टी कडून कोण निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना प्रदीप कंद, मंगलदास बांदल, जयश्री पलांडे व संजय पाचंगे यांच्यापैकी कोण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असणार अशी देखील चर्चा आता शिरुर तालुक्यात रंगू लागली आहे.