मौजे करचुंडी ता.जि.बीड येथे हजरत मंक्तुमशहा भाऊद्दिन पिराचे प्रख्यात असे देवस्थान आहे. हा पीर नवसाला पावणारा आहे. या पिराचा यात्रा महोत्सव गुरुवार दि.04-05-2023 पासून सुरू होत आहे. 

      या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. गुरुवार दि.04/05/2023 रोजी रात्री 8 वाजता संदल मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे. दि.05/05/2023 रोजी रात्री बहारदार कवाल्याचा कार्यक्रम होणार आहे व दि 06/05/2023 रोजी ठीक 4 वाजता कुस्त्यांची दंगल हा कार्यक्रम होणार आहे. 

      तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी व कुस्ती पैलवानांनी या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन करचुंडी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.