दीड वर्षांपासून फरार कोलवडी येथील तरुणास गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी केली अटक

 दिड वर्षांपासून फरार असलेला व पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करणाऱ्या कोलवडी येथील तरुणाला पोलिसांनी मांजरी खुर्द येथील माहेर संस्थेजवळ सापळा रचून पकडले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.

      सागर मोहन जाधव (वय २६) यास गांजा तस्करी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा तस्करी करणारा व डपसर पोलीस ठाण्यात दाखल गांजा तस्करीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सागर जाधव यास पोलीस मागील दिड वर्षांपासून शोधत होते. अंमली पदार्थ विरोधी पथकाला बातमीदारामार्फत जाधव हा त्याच्या मांजरी खुर्द येथील माहेर संस्थेजवळ असणाऱ्या राहत्या फ्लॅटमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.